मी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी होतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ढाका | पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारी देश बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांग्लादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी मोदींनी बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची आठवण सांगितली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी बांग्लादेशमध्ये दाखल होताच त्यांना बंदुका आणि तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. कार्यक्रमात बोलताना बांग्लादेश स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिल्या महत्वाच्या  आंदोलनांपैकी एक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

त्यावेळी मला अटकही झाली होती. बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरूवातीच्या आंदोलनातील महत्वाचे आंदोलन होते. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांग्लादेश आणि भारतातही प्रयत्न सुरू होते, असे पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, बांग्लादेशमधील जनतेची भावना भारतीयांना समजत होती. तेव्हाच्या स्वातंत्र्य संघर्षात मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या इतर सहकाऱ्यांसह बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारतात सत्याग्रह केला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, बांग्लादेशच्या स्वातंत्र्य संघर्षाला समाजातील प्रत्येक स्तरातून पाठींबा मिळाला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांची महत्वपूर्ण भूमिका सर्वांनाच माहित आहे. असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
परमबीरसिंगांच्या संपत्तीची राष्ट्रवादीकडून पोलखोल; मुंबई, हरियाणात कोट्यावधींची मालमत्ता
रश्मी शुक्लांनी भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; राजेंद्र पाटील यड्रावकरांचा खुलासा
शेतकऱ्याचा नादच नाय! पारनेरच्या या शेतकऱ्याने तैवान पिंक पेरू शेतीतून केली ४० लाखांची कमाई

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.