मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे राज्यातील नवीन कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याची मागणी वाढली आहे.
एकीकडे नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर आहे, तर दुसरीकडे दक्षिण भारतातून कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात जुन्या कांद्याला मोठा भाव आला आहे.
घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला १० किलोला ५५० ते ६२० रुपये भाव मिळत आहे. तसेच किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव वाढलेले दिसून आले असून कांद्याचे भाव तिथेही ७० ते ८० रुपये प्रति किलो दिसत आहे. तर हलका कांद्याला बाजारात ४०० ते ५५० रुपये दर मिळाला आहे.
राज्यातील जुन्या कांद्याला केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दक्षिण भारतातील राज्यांमधून चांगली मागणी मिळाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहे, असे कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपासून बंद असलेल्या खानावळी, हॉटेल्स हे सर्व उघडल्याने कांद्याच्या मागणीत वाढ होताना दिसून आली आहे. मात्र राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्या पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा कांद्याचा हंगाम डिसेंबरमध्ये सुरु होत असल्याने जुन्या कांद्याचा वाढता दर आणखी काही काळ टिकून राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते
राजीनाम्याच्या वृत्तावर खुद्द एकनाथ खडसेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी टिव्हीवर काॅमेडी शो करणारी गंगुबाई आता काय करतीय पहा