सरकारच्या ‘या’ नवीन पाॅलीसीमुळे चारचाकी वाहणांच्या किंमती तब्बल ३०% उतरणार

मुलुखमैदान: नवीन कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली स्क्रॅपेज पॉलिसी लवकरच लागू केली जाऊ शकते. शनिवारी सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली आहे.

शनिवारी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीसाठी कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले की, अपात्र व जुनी वाहने हटविण्याच्या नव्या धोरणाची कॅबिनेट नोट तयार केली गेली आहे.

स्क्रॅपेज पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे सुस्तपणा आणि घसरणीचा सामना करत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. आणि नवीन वाहनांची मागणी वाढल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला वेग येईल.

या पॉलिसीमुळे ग्राहकांना ३० टक्के स्वस्त नवीन वाहने मिळतील. जुन्या वाहनांमुळे २५ टक्के वायू प्रदूषण कमी होईल. त्याचबरोबर स्क्रॅप सेंटर्सवर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील.

तसेच जुन्या कारला स्क्रॅपेज केंद्रावर विक्री केल्यावर एक प्रमाणपत्र देण्यात येईल. ते दाखवून नवीन कार खरेदीदारांची कार नोंदणी विनामूल्य केली जाईल. या निर्णयाद्वारे सुमारे २.८० कोटी वाहने स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत येतील.

स्क्रॅपेज पॉलिसी लवकरच कॅबिनेटकडे पाठविली जाईल. त्याठिकाणी मान्यता मिळाल्यानंतर ही पॉलिसी राबवण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्याच्या पँडेमिक काळात स्क्रॅपेज पॉलिसी अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल.

स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी न वापरण्याची तरतूद हटवली जाईल. मात्र यासाठी गाडी चालवताना दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागेल. सोबतच पुन्हा नोंदणी करतानाचे शुल्क दुप्पट केले जाईल. यामुळे वाहक जुनी गाडी विकून नवीन गाडी घेतील.

या धोरणामुळे प्रमाणात कबाड केंद्रे बांधली जातील. ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्राला स्टील, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिकसारखे भाग स्वस्त रीसायकलिंगमध्ये मिळू शकतील.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.