कोरोनावर सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या 2DG औषधाची किंमत ठरली, जाणून घ्या..

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णसंख्या अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसेंदिवस हा आकडा कमी होत असला तरी अजूनही ही लाट कायम आहे. यावर अजूनही पूर्णपणे प्रभावी असे औषध बाजारात उपलब्ध आले नाही. लसीकरण सुरू असले तरी त्याला हवा तेवढा वेग नाही.

असे असताना डीआरडीओच्या DRDO 2 डीजी अँटी-कोविड 19 हे औषध प्रभावी असल्याचे बोलले जात आहे. याची किंमत देखील आता ठरली आहे. ९९० रुपये प्रति पाऊच अशी याची किंमत ठरली आहे. फार्मा कंपनी, सरकारी हॉस्पिटल, केंद्र आणि राज्य सरकारांना हे औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अँटी कोविड औषध 2-डीजीचा दुसरा साठा जारी केला गेला आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, 2डीजी औषधाच्या १०,००० पाऊचची दुसरी बॅच २७ मे रोजी डॉ. रेड्डीज लॅब जारी करेल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोविड रुग्णांवर या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली होती.

हे 2-डीजी औषध पावडरच्या रूपात पॅकेटमध्ये येते, यात पाणी मिसळून प्यायचे आहे. हे औषध सकाळी-संध्याकाळ घ्यावे लागेल, असे सांगितले जात आहे. यामुळे कोरोना रोखला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. दिल्लीत काही रुग्णांना हे औषध देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हे औषध रूग्णाच्या शरीरात गेल्यानंतर लगेच काम सुरू करते. हे औषध व्हायरसद्वारे संक्रमित पेशींमध्ये जमा होते. ज्यानंतर हे ड्रग व्हायरस सिंथेसिस आणि एनर्जी प्रॉडक्शन करून संसर्गाला वाढण्यापासून रोखते. यामुळे रुग्णांचा जीव वाचू शकतो.

हे औषध थेट संक्रमित पेशींवर परिणाम करते. यामुळे संक्रमित रूग्ण बरे होण्यास मदत होणार आहे. यामुळे कोरोना झाला तरी तो जास्त मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही. हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने हे औषध बनवले आहे. यामुळे एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

लाखाचे सव्वा दोन लाख व्याज घेणाऱ्या सावकाराची मस्ती उतरली, पोलिसांकडे गेली तक्रार आणि…

१५ दिवसात १ कोटी ५ हजार देत माफी मागा, नाहीतर…; निलेश लंकेंनी मनसे पदाधिकाऱ्याला दिला इशारा

मोठी बातमी! राज्यात पुढचे १५ दिवस लॉकडाऊन वाढवला; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.