८ महिन्याची गरोदर महिला उचलतेय तब्बल १५० किलो वजन अन् करतेय हेवी वर्कआऊट; पहा व्हिडिओ

एखादी महिला जर गर्भवती असेल, तर डॉक्टरांसोबतच सर्वजण तिला आराम करण्याचा सल्ला देतात. प्रेग्नंसी असताना महिलेला आपली खुप काळजीही घ्यावी लागते, तसेच थोड्याफार शारीरीक हालचाली कराव्या लागतात.

तसेच साधा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पण कधीही जास्त वजन उचलण्यास, धावपळ करण्यास सांगितले जात नाही. पण सध्या सोशल मीडियावर प्रेग्नंट महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून आहे.

आठ महिन्यांच्या प्रेग्नेंसीमध्ये एक महिला तब्बल १५० किलोचे वजन उचलताना दिसून येत आहे. तसेच काही हेवी वर्कआऊट करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

अमेरिकेच्या न्यु यॉर्कमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव याना मिलुटोनोविक आहे. याना सध्या ८ महिन्याची गर्भवती असून तिच्या डिलिव्हरीला फक्त ८ महिने शिल्लक आहे. अशा परिस्थीत तिने आराम करुन तिची आणि तिच्या बाळाजी घेतली पाहिजे, पण ती जिममध्ये वर्कआऊक कराताना दिसत आहे.

यानाने इन्स्टाग्रामवर आपल्या हेवी वर्कआऊचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर असे अनेक व्हिडिओ तिने पोस्ट केले आहे. तिचा वर्कआऊट पाहून अनेकांना घाम फुटला असेल.

यानाच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला असून अनेक लोकांनी या व्हिडिओला प्रतिक्रिया दिल्या आहे. काही नेटकऱ्यांनी तर तिला ट्रोलही केले आहे. या महिलेला सर्वांचे लक्ष स्वत:कडे खेचुन घेण्याची खुपच हौस आहे वाटतं, असे एका युजरने म्हटले आहे. पण तिने लोकांचे कमेंटला उत्तर देण्यासाठी अजून व्हिडिओ पोस्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

गाणी दाखवायची सोडून तुम्ही हे काय दाखवताय.? इंडियन आयडलच्या ‘शो’वर प्रेक्षक संतापले
“मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: कोरोना पसरवला, आणि आता रडत आहेत”
ह्या बाळाचा डान्स पाहून भले भले तोंडात बोट घालतील; गाणंही किती गोड गातय..; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.