…म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही- सुप्रीम कोर्ट

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षाकडून सरकार पाडण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. अशात राज्य सरकारवर मुंबईतील परिस्थिती हाताळण्यावर विरोधी पक्ष प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे.

याच पार्श्वभुमीवर राज्यात राष्ट्रपती लागवट सुरू करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हि याचिका मुंबईतील कोरोनाच्या प्रश्नावरुन, तसेच मुंबईतील काही मुद्दांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे फक्त मुंबईतील प्रश्नावरुन राज्यात राज्यात लागू करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्र किती मोठे आहे, हे तरी माहित आहे का? असा प्रश्न करत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटाकारले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सरन्यायाधिश बोबडे यांनी फेटाळली आहे.

दरम्यान, सरकार स्थापनेच्या सुरूवातीपासूनच महाविकास आघाडी सरकारवर टिका केली जात आहे. तसेच कोरोनाचे संकट रोखण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोपही विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर करण्यात आला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत

हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे बंद करून दाखवावेत

पानटपरी चालवनारे भाऊ कदम अख्ख्या महाराष्ट्राचे हास्यसम्राट झाले; पहा कसा झाला हा चमत्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.