राष्ट्रपती दलित असल्याने भाजपात त्यांना किंमत नाही, पंतप्रधान त्यांचा नमस्कारही घेत नाहीत

नवी दिल्ली | भाजप आणि काँग्रेसचे नेते अनेकदा एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येतात. यादरम्यान त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य केली जातात. नेत्यांची अशी वादग्रस्त वक्तव्य नंतर चर्चेचा विषय ठरतात. असाच प्रकार एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान घडला आहे.

वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला ‘माझी भाजपात राहण्याची लायकी नव्हती’ असे म्हणाले. यानंतर निवेदिकेने काँग्रेस नेते उदित राज यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाजपावर जोरदार पलटवार केला.

भाजपात दलितांना कोणतेही स्थान नाही असं म्हणत उदित राज यांनी भाजपावर आगपाखड करायला सुरूवात केली. दरम्यान, भाजपच्या प्रवक्त्याने देशाचे राष्ट्रपती दलित आहेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावर काँग्रेस नेते उदित राज चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

यावर उदित राज म्हणाले की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपाचे नेते किंमत देत नाहीत. रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे राहतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींनी हात जोडून नमस्कार केला तर मोदी त्यांच अभिवादनही स्वीकार करत नाहीत, असा प्रहार उदित राज यांनी केला.

उदित यांच्या या वक्तव्यामुळे संतापलेले भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी चांगलाच पलटवार केला. ते म्हणाले भाजपाने उदित राज यांना दिल्लीतून खासदार केले. काँग्रेसने त्यांच्यासाठी काय केले? काँग्रेसमध्ये उदित राज यांचे स्थान काय? असा सवाल शुक्ला यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-
अखेर सचिन वाझेनी दिली गुन्ह्याची कबुली म्हणाला, सारं मीच केलं; कारण….
रश्मी शुक्लांनी भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; राजेंद्र पाटील यड्रावकरांचा खुलासा
देवेंद्र फडणवीसांना जशाच तसे उत्तर द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.