त्या ८ महिन्यांच्या गरोदर होत्या, मात्र दिवस-रात्र काम करून बनवले कोरोना चाचणीचे किट

पुणे । देशात कोरोना रुग्ण अजूनही कमी होताना दिसत नाहीत. तसेच कोरोना टेस्ट करण्यास उशीर होत असल्यानेे रुग्ण दगावण्याची शक्यता देखील वाढू लागते. काही ठिकाणी टेस्ट करण्यासाठी व त्याचा रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवसांची वाट पाहावी लागते. यामुळे परिस्थिती बिघडत जाते आता मात्र तसे होणार नाही.

आता आपण घर बसल्या कोरोना टेस्ट करू शकतो. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे. हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक याचा वापर करु शकतात.

तुमच्या चाचणीचा अहवाल अँपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत दिला जाईल. तसेच तिथे तो गुप्त ठेवला जाईल. सध्या एकाच कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.

या कंपनीच्या मीनल दाखवे भोसले यांच्या नेतृत्त्वात किटची निर्मिती करण्यात आली आहे. या कंपनीच्या प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे-भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने या किटचे डिझाईन तयार केले आहे. यासाठी मोठा वेळ आणि कष्ट करावे लागले आहेत.

हे किट तयार करताना त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. पुण्यातील एनआयव्ही या संस्थेत १८ मार्च २०२० रोजी किटची पहिली चाचणी घेण्यात आली. याच्या दुसऱ्याच दिवशी मीनल यांनी मुलीला जन्म दिला. या काळात त्यांनी मोठे काम करून दाखवले.

त्यांना गर्भारपणात काही तक्रारी आल्याने मीनल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला की लगेच त्यांनी काम सुरू केले. दिवस-रात्र १० जणांच्या टीमने काम केले. आणि त्यांना यश मिळाले.

यानंतर त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली. आता हे पुढील आठवड्यात सर्वांना उपलब्ध होणार आहे. याची किंमत देखील सर्वांना परवडेल अशी २५० रूपये एवढी आहे.

ताज्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.