प्रेग्नेंट असताना देखील अनुष्का शर्मा करतेय शीर्षासन, विराट करतोय मदत, पहा फोटो..

मुंबई ।  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच आई-वडील होणार आहेत. त्यांनी लॉकडाऊनमध्ये आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.

गर्भवती असताना देखील अनुष्का शर्मा अजूनही आरामात चित्रपटांचे शूटिंगही करत आहे. आता अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काला शिर्षासन करायला मदत करत आहे.

पती विराटनेही योगा करताना तिला मदत केली. योगाच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली हे आसन केले. गर्भवती असतानाही मला योगा करता आला, याचा आनंद आहे. हा फोटो जुना आहे, असे अनुष्काने सांगितले आहे.

हे आसन सगळ्यात कठीण आहे, योगा माझ्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. गर्भवती असतानाही आधी जो योगा करत होतीस, तोच योगा कर असे डॉक्टरांनी सांगितल्याचे अनुष्का म्हणाली.

सध्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये आहे, तर अनुष्का शर्मा मुंबईमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली टेस्ट खेळून विराट मुंबईला परतणार आहे. बीसीसीआयनेही विराटच्या पितृत्वासाठीच्या रजेला परवानगी दिली आहे.

या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. सलग दोन्ही सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. यामुळे विराटवर देखील टीका होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.