मोहब्बतें चित्रपटातील प्रीती झंगियानी आता दिसते अशी, फोटो पाहून वेडे व्हाल

मोहब्बतें चित्रपट अजूनही लोक आवडीने पाहतात. याच चित्रपटातून अनेकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रीती झंगियानी. बरेच दिवस झाले प्रीती बॉलीवूडपासून लांब आहे पण ती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.

२००० साली तिचा मोहब्बतें हा चित्रपट आला होता जो त्या काळचा हिट चित्रपट ठरला. प्रीतीचा जन्म हा मुंबईतच झाला. ती सिंधी कुटुंबात जन्माला आली होती. सर्वप्रथम राजश्री प्रोडक्शनच्या ये है हम या चित्रपटात तिने काम केले होते.

त्यानंतर तिला काही गाण्यांची ऑफर आली आणि तिथून पुढे ती लोकप्रिय झाली. मॉडेल आणि ऍक्टर असलेल्या प्रवीण डब्बास याच्यासोबत तिने नंतर लग्न केले. प्रवीण अभिनेता आहे आणि तो यासोबतच स्कुबा डायव्हिंगसुद्धा करतो. प्रीती सध्या मुंबईत राहते आहे.

सध्या ती तिच्या मुलांची निगा राखण्यात व्यस्त आहे. मोहब्बतें चित्रपटात काम केल्यानंतर तिला अनेक चित्रपटांचे ऑफर आले. तिने आन, एलओसी, अनर्थ या चित्रपटातदेखील काम केले आहे. पन प्रीती सोशल मिडियावर सतत एक्टिव्ह असते.

एवढी वर्षे झाली पण तिच्या सुंदरतेत जास्त फरक झाला नाही. ती आजपण हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असल्याने ती नेहमी चर्चेत असते. तिच्या नवीन लुक्सवर चाहते आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवत असतात. इन्स्टाग्रामवर ती सतत आपले नवनवीन लुक्स पोस्ट करत असते.

महत्वाच्या बातम्या-

टाईम्सच्या सन्मानाची मानकरी ठरलेली भारतीय वंशाची १५ वर्षांची मुलगी आहे तरी कोण? तिच काम अभिमानास्पद आहे!

युपीआय ट्रान्झेक्शन करताय?  १ जानेवारीपासून होणार हा महत्वाचा बदल, जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.