Homeताज्या बातम्यानवरदेवाचा नवरीवर गेला तोल अन् नको तेच घडलं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

नवरदेवाचा नवरीवर गेला तोल अन् नको तेच घडलं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ

आतापर्यंत तुम्ही अनेक प्री-वेडिंग फोटोशूट पाहिले असतील. यामध्ये तुम्हाला सुंदर लोकेशन्स तर बघायला मिळतातच शिवाय फोटोग्राफरची क्रिएटिव्हिटीही पाहायला मिळते. त्यामुळे फोटोग्राफर्स कपल्सला त्यांचे फोटोशूट अविस्मरणीय बनवण्यासाठी बऱ्याचदा हटके आयडिया देताना दिसतात.

पण कधी-कधी ही क्रिएटीव्हीटी कपलला इतकी महागात पडते की पुढच्या वेळेला फोटोशुट करताना त्यांना चारवेळा विचार करावा लागतो. आता सध्या अशाच एका प्री-वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजच्या जमान्यात सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे, ज्यामुळे लोकांना हसण्याची आणि हसवण्याची संधी मिळत आहे. असेच काहीसे व्हायरल होत असलेल्या प्री वेडींग व्हिडिओ सोबत झाले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना हसूच आवरेनासे झाले आहे.

झाले असे की, फोटोग्राफरने एका कपलचा एक मस्त फोटो काढण्यासाठी चिखलाने भरलेली जागा निवडली होती. हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण फोटोग्राफरला या ठिकाणाहून शेवटी काय साध्य करायचे होते हे समजण्यापलीकडचे आहे. फोटोशूटच्या प्लॅननुसार मुलाने मुलीला उचलायचे होते. मात्र मुलाने मुलीला उचलताच तो चिखलात घसरला आणि दोघेही तिथेच पडले. त्यानंतर दोघेही हसायला लागतात.

या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र, तो कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. २९ डिसेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

एका यूजरने प्रश्न विचारताना लिहिले आहे की, हीच जागा सापडली होती का? त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट करताना लिहिले आहे, वाह..लग्नापूर्वीचे क्रिएटिव्ह फोटोशूट. त्याचप्रमाणे आणखी एक युजर म्हणतो की, अरे भाई क्रिएटीव्हीटीच्या नादात पुर्ण घाण झाली.

महत्वाच्या बातम्या-
“विराट कोहलीचे आकडे पण रहाणे-पुजारासारखेच, त्याला संघातून का काढून टाकत नाही?”
..तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंदही माईंना पाहून खुर्चीवरून उठले होते, पुन्हा व्हायरल होतोय तो व्हिडीओ
“मी वाटेल ते करेल मला कोण काहीच बोलणार नाही असे वानखेडेंना वाटायचे, तेच त्यांना नडले”