‘अशी’ करा १५ फुट जागेत केसरची शेती आणि कमवा लाखो रुपये; दोन भावांचा भन्नाट प्रयोग

 

आजकाल नोकरीची संधीच उपलब्ध होत नसल्याने अनेक तरुण-तरुणी आपला व्यवसाय सुरु करताना दिसून येत आहे. तर काही तरुण हातातली नोकरी सोडून, शेतात वेगवेगळे प्रयोग करुन लाखो रुपयांची कमाई करताना दिसून येत आहे.

आजची हि गोष्ट अशाच दोन तरुणांची आहे, ज्यांनी आपल्या हातातली नोकरी सोडली आणि शेती व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांनी शेतात एक प्रयोग केला आणि त्यातून ते चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे.

या दोन शेतकरी तरुणांनी स्वता:च्या घराच्या छतावर फक्त १५ फुटांच्या जागेत केसरची शेती केली आहे. तसेच ते या प्रयोगातून लाखो रुपये कमवताना दिसून येत आहे. हिसार जिल्ह्याच्या कोथकाला गावात राहणाऱ्या या दोन भावांची नावे नवीन आणि प्रवीण असे आहे.

त्यांनी शेती करताना ऐयरोफोनिक पद्धतीने केसरची शेती केली आहे. या शेतीतून त्यांनी तब्बल ६ ते ९ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी घराच्या छतावर १५ बाय १५ च्या जागेत ही शेतीत केली आहे.

या दोन भावांनी तयार केलेल्या शेतीचा हा प्रॉजेक्ट ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये २०२० मध्ये संपला होता. त्यांच्या या प्रयोगातून जवळपास १ ते दीड किलो केसरचे उत्पादन त्यांनी घेतले होते.

त्यांना सुरुवातीला ६ ते ९ लाखाचे उत्पादन मिळाले होते. हा प्रयोग तुम्ही ७ ते १० लाख रुपयांत सुरु करुन १० ते २० लाख रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतात. विशेष म्हणजे ही शेती करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या जागेची गरज पडणार नाही.

केसरची शेती करण्यासाठी दिवसा तापमान २० अंश सेल्सिअस हवे असते. तर रात्री तापमान १० अंश सेल्सिअस हवे. तसेच ह्युमस ९० टक्के असली पाहिजे.

हि शेती करताना सुर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते. त्यामुळे सुर्यप्रकाश पडेल अशाच ठिकाणी हा प्रयोग करावा, जर सुर्यप्रकाश मिळत नसेल, तर लाईटचा वापर करावा पण त्यासाठी लाईट बॅक्टेरीया फ्रि असणे गरजेचे आहे.

बाजारात केसरला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे हा प्रयोग व्यवस्थित नियोजन करुन तुम्ही केला तर केसरच्या शेतीतुन तुम्ही पण लाखो रुपये कमवू शकतात. केसरपासून साबन, फेसमास्क यांसारख्या अनेक गोष्टीही तयार करता येऊ शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.