प्रवीण दरेकरांना एवढी मस्ती कशाची आलीय? माफी मागा नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही

आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत करत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा तोल गेला असून बरीच आक्षेपार्ह वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केली आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे” असा अप्रत्यक्ष टोला दरेकर यांनी लगावला होता. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादीनेही दरेकरांविरोधात टीकेची झोड उठवली आहे.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेखा फड यांनीही शेलक्या शब्दात दरेकरांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ‘प्रवीण दरेकरांना एवढी मस्ती कशाची? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजाने नाकारलेल्या, सदैव दुर्लक्षित राहिलेल्या अशा तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना राजकारणात संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. लोककलावंत किंवा गरीब मागास पुरूष कोणीही असो, सर्वांना राजकीय पक्ष प्रवेश करण्याचा व राजकारण करण्याचा हक्क आहे. आणि तो लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला आहे.

पण भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता या नावाला कलंक असलेले, यांनी ते किती दिड शहाणे आहेत हे शेखचिल्ली सारखे उदाहरण देवून दाखवून दिले आहे. महिलांबद्दल अर्वाच्य भाषेत टिप्पणी करणाऱ्या या ‘रंगेल’ विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा का घेवू नये?’

‘मला वाटतं प्रवीण दरेकर स्वअनुभव सांगतायत. उचलली जीभ लावली टाळ्याला जरा तरी लाज वाटू द्या. तुमच्या फाजील वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. पण एक लक्षात ठेवा तुम्ही उधळलेल्या या बेलगाम मुक्ताफळामूळे तमाम माता-भगिनींचा अवमान झाला आहे.

प्रविण दरेकर तुम्हाला जनाची नाही निदान मनाची जरी थोडी शिल्लक असेल तर ताबडतोब महिलांची जाहीर माफी मागा. नसता उद्यापासून राष्ट्रवादी महिला काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर फिरू देणारं नाही हे लक्षात ठेवा. हा धमकीवजा इशारा समजा. आणि एवढं होऊनही जर तुम्ही माफी मागितली नाहीत, तर मात्र आम्ही तुमचं ‘थोबाड’ आणि गाल नक्कीचं रंगवू शकतो’

प्रवीण दरेकर यांनी केलेल्या या वक्तव्याने राष्ट्रवादी ही नक्कीच खवळली असून आता राणे विरुद्ध शिवसेना नंतर दरेकर विरुध्द राष्ट्रवादी हा वाद बघायला भेटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या
“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली, जय मल्हार”
केबीसीतील स्पर्धकाने शाहरुखची चांगलीच जिरवली, मिठी मारण्यास नकार देत अभिनयावरूनही झापले
अहमदनगरच्या पोलिस अधिकाऱ्याने अभिनेत्रीकडे केली ‘ही’ विचित्र मागणी, मागणी पाहून अभिनेत्री संतापली
धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.