“ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे”; प्रविण दरेकरांनी लगावला टोला

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पंढरपूर तालुक्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी गावागावातील बांधावर गेले आहेत. यावेळी “ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार,” असं म्हणत केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळू नका, अशी टीका दरेकरांनी सरकारवर केली.

“पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीच्या मदतीबाबत बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुत्सित टिप्पणी करुन आपले अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत आहेत.” असे दरेकर यावेळी म्हणाले.

तसेच “या सरकारची ही स्ट्रॅटेजीच बनली असून चक्रीवादळ असो, कोरोना असो, अतिवृष्टी -गारपीट असो किंवा महापूर अशा सर्वच काळात कधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार, कधी बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तर कधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री असे विविध वाद निर्माण करुन जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने मदत केली नाही तर भाजप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष उभारेल, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला. पूरग्रस्त पाहणी दौरा संपल्यावर दरेकर यांनी कुंभार घाट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. “निवडणुकीपूर्वी जी गारपीट झाली होती तेव्हा बांधावर जाऊन हेक्टरी २५ आणि ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी ठाकरे करत होते. आता तर त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली असताना उद्धव ठाकरे यांनी वचन पाळावे आणि तात्काळ पंचनामे न करता मदत द्यावी,” असेही पुढे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांची कोंबड्यासारखीच अवस्था झालीये; राष्ट्रवादीची फडणवीसांवर बोचरी टिका

हेमामालिनीशी लग्न करायला परवानगी देताना धर्मेंद्रच्या पत्नीने टाकली होती ‘ही’ विचीत्र अट

अखेर कपिलने मुकेश खन्ना यांना दिले प्रत्युत्तर; म्हणाला मी आणि माझी टीम…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.