‘वाढत्या गुन्हेगारीला सरकार जबाबदार, कृष्ण प्रकाशसारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीने बिघडला’

भाजप नेते प्रविण दरेकर हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, पोलिसांचा धाक आणि दरारा कमी पडत आहे.

वाढणाऱ्या गुन्हेगारीला पुर्णपेणे सरकार जबाबदार आहे. एनजीओ राजकीय पक्ष पोलिस प्रशासन तज्ञ यांच्यासोबत व्यापक बैठक घेण्यात गरज आहे. वारंवार घटना घडत असताना काही प्रतिबंधात्मक होत नसेल तर गुन्हा करणाऱ्यांची हिंमत धजावते. कृष्णप्रकाशसारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीने बिघडला असून ते बेताल वक्तव्य करत आहेत अशी जहरी टीका त्यांनी सरकारवर आणि कृष्णप्रकाश यांच्यावर केली आहे.

सरकारच्याच भावना अधिकाऱ्यांच्या तोंडून व्यक्त होतात. बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा राजकारणात सरकारला जास्त रस आहे. सरकार स्वताच्या भूमिकेशी ठाम नाही. राजकारणाने आरक्षण हा इतकाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्याबाबत बैठका घेणे गरजेचे आहे, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते आयुक्त कृष्ण प्रकाश?
जोपर्यंत भर चौकात खुन होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. या सामाजिक घटना नाहीत असे कृष्ण प्रकाश म्हणाले होते. पुढे बोलताना म्हणाले की, खुनाच्या घटना वाढल्या नाहीत कमीच आहेत. खुन व्हायला नाही पाहिजेत या मताचा मी आहे.

नागरिकांच्या समोर भर चौकात जोपर्यंत खुन होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. आता झालेल्या खुनाच्या घटना सामाजिक नाहीत. शहरात कामगार वस्त्या आणि कामगार भरपूर आहेत. अनलॉकनंतर बाहेरील लोक कामासाठी आले आहेत.

त्या लोकांमध्ये आपआपसात वाद होतात आणि अशा घटना घडतात. त्यामुळे समाजात भिती बाळगण्याचे कारण नाही. या घटना व्यक्तिश आहेत असे म्हणत त्यांनी आपली जबाबदारी बाजूला सारली आहे. पुढे ते म्हणाले की, अशा घटना कायद्याच्या भितीने संपत नाहीत. कायदा अवगत असेल तर भिती असते. रागात नसतो तेव्हा कायद्याची भिती असते असं कृष्ण प्रकाश म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या
पुरूषांपेक्षा महिलेसोबत इंटीमेट सीन करणे सोपे आहे, मल्लिका शेरावतचे या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन
फेसबूकवर रोपे विकून या महिलेने कमावलेत महिन्याला लाखो रूपये, एका छोट्या टेरेसवर फुलवली बाग
तब्बल ९६ कंपन्यांचे मालक आहेत रतन टाटा, त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून अवाक व्हाल
तुमच्यात हिंमत असेल तर ‘त्या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा; राजू शेट्टींचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.