“तीन पक्षाचं सरकार सांभाळणं ठाकरे सरकारचा प्राधान्यक्रम, त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर उडाली”

मुंबईच्या साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्काराच्या प्रकणामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया दिली जात आहे.

भाजप नेतेही यावेळी आक्रमक झालेले दिसून येत आहे. महिलेवर बलात्कार करणाऱ्या विकृत नराधामांना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

भाजप नेत्यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीकाही केली आहे. आता या प्रकरणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तीन पक्षाचं सरकार सांभाळणं महाविकास आघाडीचा प्राधान्यक्रम आहे, त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली, त्यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या महिला सुरक्षा व्यवस्थेबाबत नापसंती व्यक्त केली आहे. राज्यातील महिलांप्रती राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील असल्यामुळे गेली दोन वर्षे महिला आयोगावर नेमणूका झाल्या नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

महिला आयोगावरील नेमणूकांची फाईल उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याकडे गेल्यानंतर ते सही करत नाही. यावरुन महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

तसेच सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली आहे. त्यामुळे पोलीसांनाही काम करणे कठिण झाले आहे. पोलीसांचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”‘तारक मेहता…’फेम बबिता भडकली
“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील चिमुकलीच्या भन्नाट डान्सने घातला धुमाकूळ? पाहा व्हिडीओ
मानलं बुवा! इस्त्रायलमधील कैद्यांचा आगळावेगळा प्रताप; चमचाने बोगदा खाणुन तुरूंगातून काढला पळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.