“प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांनी संविधानाचा अपमान केलाय”

मुंबई । गणेशोत्सव कोरोनाच्या सावटातही उत्साहात साजरा केला जात आहे. यातच अभिनेता प्रवीण तरडे गणपतीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीखाली संविधानाची प्रत ठेवल्याने सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

याप्रकरणी अनेकांनी तरडेंवर टीका केली आहे. त्यानंतर तरडेंनी त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट करत आपल्या हातून चूक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र हा वाद शमलेला नाही.

तरडे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा थेट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (खरात) देण्यात आला आहे. प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत.

त्यांनी संविधानाच्या प्रतीवर गणपती बसवून लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी ही विनंती, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यांनी या ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराज देसाई यांना मेन्शन केले आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे.

तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारादेखील खरात यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे, यामुळे हा वाद आता पेटण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.