Share

प्रवीण तांबे पुन्हा आले चर्चेत, यावेळी चित्रपट नाही तर ‘तो’ अनोखा रेकॉर्ड आहे कारण, वाचून अवाक व्हाल

राजस्थान रॉयल्सचा माजी लेगस्पिनर प्रवीण तांबे(Praveen Tambe) यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट नुकताच एका OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रवीण तांबे यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. प्रवीण तांबेने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.(Praveen Tambe is back in the spotlight, this time it is not a movie but for unique record)

आयपीएल पदार्पणापूर्वी त्याने कोणताही प्रथम श्रेणी, लिस्ट ए किंवा टी 20 सामना खेळला नव्हता. प्रवीण तांबेला २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रवीण तांबे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

आत पुन्हा एकदा प्रवीण तांबे चर्चेत आला आहे. माजी लेगस्पिनर प्रवीण तांबेने याच दिवशी एक चमत्कार केला होता. ५ मे २०१४ रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट रायडर्स या संघाशी सामना झाला होता. या सामन्यात केकेआरचा संघ विजयाच्या अगदी जवळ आला होता.

यावेळी प्रवीण तांबेने एकापाठोपाठ संघाच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले होते. या सामन्यात प्रवीण तांबेने १५ वे षटक टाकले होते. या षटकातील पहिला चेंडू वाईड होता. या चेंडूवर केकेआर संघातील मनीष पांडे यष्टिचित झाला. यानंतर युसूफ पठाण मैदानात आला होता. युसूफ पठाण देखील पुढच्याच चेंडूत झेलबाद झाला.

त्यानंतर कोलकाताचा रायन डॅन डोस्कटे मैदानावर आला होता. प्रवीण तांबेने त्याला एलबीडब्ल्यू केले. अशाप्रकारे लेगस्पिनर प्रवीण तांबेने दोन चेंडूत तीन बळी घेत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. दोन चेंडूत तीन बळी घेणारा प्रवीण तांबे आयपीएल इतिहासातील एकमेव गोलंदाज आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने १७० धावा केल्या.

त्यानंतर केकेआर संघाची सुरवात जोरदार झाली. सलामीवीरांनी १२१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे या सामन्यात राजस्थानचा पराभव निश्चित वाटत होता. पण २ धावांमध्ये संघाने ६ विकेट्स गमावल्या. अखेर हा सामना राजस्थानने १० धावांनी जिंकला. या विजयात प्रवीण तांबेने मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात प्रवीण तांबेला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या :-
‘आई..लवकर घरी परत येईन’ असं सांगून गेलेल्या वैष्णवीचा मृतदेहच आला घरी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना
अखेर ठरलं! ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार KGF 2, तब्बल ३२० कोटींना विकले गेले डिजिटल हक्क
KGF 2 ने OTT चेही रेकॉर्ड मोडले, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना विकले गेले डिजिटल हक्क

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now