‘प्रवीण दरेकर तुम्ही महिलांची माफी मागा, नाहीतर थोबाड रंगवू’

पुणे । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असे म्हणत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर नाव न घेता टीका केली होती. यामुळे आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.

त्या म्हणाल्या, ‘तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच प्रवीण दरेकर आपण विरोधीपक्ष नेते आहात. पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही. प्रवीणजी तुम्ही आणि तुमच्या पक्षात महिलांबद्दल नेहमी दुय्यम वागणूक देण्याची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून ती घाण टपकत आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, असेही चाकणकर म्हणाल्या.

तुम्ही ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे प्रवीण दरेकर यांनी हे वक्तव्य केले होते. यामुळे त्यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली जात आहे. रुपाली चाकणकर याबाबत आक्रमक झाल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.