स्वत:च्या व पाच जणांच्या लसीचे पैसे सीएम फंडात देणार; जयंत पाटलांच्या मुलाचा भारी निर्णय

राज्यभरात कोरोनाच्या संकाटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात आता लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.

आता १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना मोफत लसीकरणाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. आता या निर्णयानंतर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

लसीकरण मोफत असले तरी लसीची किंमत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदत म्हणून देऊ. इतकेच नाही स्वत:च्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा निर्णय प्रतिक पाटील यांनी घेतला आहे.

तसेच आपल्याला शक्य असेल, तर आपणही लसीचे पैसे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत म्हणून द्या. आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे, असेही प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे.

ज्यांना कोरोनाची लस विकत घेणे परवडत आहे, ते नागरीक लसीचे पैसे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देत आहे. त्यामध्ये आता प्रतिक पाटील यांचीही भर पडली आहे. प्रतिक पाटील यांच्या निर्णायामुळे पुर्ण राज्यभरत त्यांचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आता १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील ५ कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाब्लो एस्कोबार: कहाणी अशा श्रीमंत गुन्हेगाराची ज्याचे करोडो रूपये वाळवी लागल्यामुळे वाया जायचे
शोलेच्या शुटींग वेळी अमिताभ धर्मेंद्रसोबत बोलायचं दूर त्यांच्याकडे बघतही नव्हते; कारण..
अरे हाड..आम्ही प्रश्न विचारणार, सत्तेतल्या प्रत्येकाला; मराठमोळा अभिनेता राजकारण्यांवर संतापला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.