Homeताज्या बातम्यामाजी मुख्यमंत्री राणेंना मिळणार आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

माजी मुख्यमंत्री राणेंना मिळणार आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

सध्या गोव्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. यातच काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. याबाबतचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. भाजप सरकारच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रताप सिंह राणेंनी त्यांचे पुत्र भाजप नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजीत राणे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय घेतला आहे. जनतेला ते कायम प्रेरणादायी ठरले आहे, त्यामुळे त्यांना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

आमच्या सरकारने जेष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना आजन्म मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषवली आहे. गोव्यातील सर्व स्तरातील जनतेला ते कायम प्रेरणादायी ठरले आहे, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

राज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असताना कायम त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना आजन्म कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असेही प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना प्रताप सिंह यांनी अचानक निवृत्ती घेतली होती. यामुळे काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली होती. मी राजकारणात सुमारे ५० वर्षे पुर्ण केली आहे. आता मला विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. मला आता वाटत आहे की आराम करुन नव्या पिढीला संधी द्यावी. गोवा प्रगतीशील राज्य असून तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे प्रताप सिंह राणे यांनी म्हटले आहे.

राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा २१ डिसेंबरला केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पोरीम मतदार संघातून उमेदवारी दिली होती. प्रताप सिंह राणे हे ८२ वर्षांचे असून ११ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पेन्शनधारकांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट! तब्बल ९ पटीने वाढणार पेन्शनची रक्कम
‘या’ स्टार खेळाडूच्या फलंदाजीवर संतापले गावस्कर; म्हणाले, संघाची जबाबदारी असताना असं खेळणं मुर्खपणा
घरवाली बाहरवाली! एकाच शहरात दोन पत्नींसोबत राहत होता तरूण, असा झाला भांडाफोड