मंगळवारी सकाळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा घातला. यानंतर आता “ईडीचे लोक माझ्या मुलांना म्हणले की तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलतात” असा खुलासा प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
“ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचे विचारत होते असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. “या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही” असे प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
तसेच “या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी आहे,” असे प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
सरनाईक म्हणाले, “माझ्या तसेच मुलांच्या घरी, ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. चार पाच वेळा चहा घेतला, जेवण केले. एखाद्या घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसे करायचे हे सरनाईक कुटुंबाला चांगले माहिती आहे. माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी त्यांचे चांगले स्वागत केले, यथोच्छ पाहुणचार केला,” असे सरनाईक म्हणाले.
पुढे सरनाईक म्हणाले, “पण एक मात्र आहे ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत”.
“शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी आहे.” असे ते म्हणाले.
राजेश खन्नाच्या करिअरचा शेवट यश चोप्रामूळे झाला होता?
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला होता पाठिंबा; वाचा सत्ता स्थापनेची इनसाईड स्टोरी