नेता असावा तर असा! ‘बैठक घेतली रानात अन् वाद मिटवला क्षणात’

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी भालगाव ता. नेवासे येथे निवडणूक काळात मंदिराकडे जाणारा रस्ता करून देतो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंत्री गडाख यांचे भाऊ यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी यासाठी पुढाकार घेत एक घाव दोन तुकडे करत काम पुर्ण करून दिले.

मंत्री गडाख यांनी या रस्त्यासाठी निवडून आल्यावर २५ लाखांचा निधी मंजूर करून दिला. पण काम सुरू होण्यामध्ये बांध मध्ये येत होता. त्यामुळे वाद पेटला होता. पण बांधावर प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांमध्ये वाद सोडवत रस्त्याचाही अडथळा प्रशांत गडाख यांनी दूर करून दिला.

प्रशांत पाटील गडाख यांनी हे चुटकीसरशी सोडवले. त्यामुळे ‘बैठक घेतली रानात अन वाद मिटला क्षणात…’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रशांत गडाख यांनी पुढाकार घेत या रस्त्याची पहाणी केली. वाद असलेल्या काही शेतकऱ्यांना समोरासमोर आणून त्यांची समजूत काढली. त्यामुळे वाद मिटला.

भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटर रस्ता शेताच्या बांधावरील आणि शेतकऱ्यांमधील व्यक्तिगत वाद यामुळे बंद होता. यामुळे या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर रहाणारे शेतकरी ही चिंतेत होते.

इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखती सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार

आरारारा! जेनियलियाने रितेशसोबतचा बेडवरचा व्हिडीओ केला शेअर; उघडाबंब रितेश जेनेलियाला..

अकोल्याच्या ‘या’ अडीच वर्षाच्या मुलीची स्मरणशक्ती बघून वेड लागेल; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीये नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.