प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांच्या निवडीला नापसंती दर्शविली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आपली पहिली पसंती नसल्याचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे.(Prashant Kishor prefers ‘this’ leader, not Rahul-Priyanka, for Congress presidenc)
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी या आपल्या पहिली पसंती असल्याचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीच्या विषयावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्याशी काँग्रेसमध्ये बदल करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे देखील सांगितले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले की, “काँग्रेस पक्षात बदल करण्याच्या संदर्भात मी प्रेझेंटेशन दिलं. यावेळी पक्षाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात देखील सविस्तर चर्चा झाली. याबाबतीत मी कोणत्याही गोष्टी उघड करू शकत नाही. अध्यक्ष निवडीसंदर्भातील माझे विचार मी त्यांना सांगितले आहेत. या गोष्टी पूर्ण कमिटी समोर झालेल्या नाहीत.”
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, ” प्रियांका गांधी यांना काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष बनवावं, असं मी बोललो नाही. यासंदर्भातील माहिती चुकीची आहे. मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. काँग्रेसचं अध्यक्षपद असणाऱ्या व्यक्तीकडे संसदीय पक्षाचं नेतेपद नसावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. सोनिया गांधी यांच्याकडे सध्या दोन्ही पदे आहेत.”, असे प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत सांगितले आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत काँग्रेस पक्षासोबत झालेल्या बैठकीसंदर्भात माहिती दिली. प्रशांत किशोर म्हणाले की, “या बैठकीदरम्यान आमची अनेक गोष्टींवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अनेक गोष्टींवर त्यांनी सहमती दर्शविली. या गोष्टींवर काम केल्यास काँग्रेस पक्षाला येत्या काळात चांगला फायदा होईल”, असे देखील प्रशांत किशोर यांनी सांगितले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेस पक्षाचे नेतृत्व देण्यात येणार आहे, अशा चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांना यासंदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, “काँग्रेसचं नेतृत्व माझ्याकडे देण्यात येईल, एवढा मी मोठा नाही. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. यासाठी मी त्यांचे आभार मानतो.”
महत्वाच्या बातम्या :-
…त्यामुळे दौऱ्याच्या आधीच राज ठाकरेंना बसला ७५०० रुपयांचा दंड, वाहतुक पोलिसांची कारवाई
वसंत मोरेंनी मनसे सोडली? राज ठाकरेंच्या दौऱ्यात अनुपस्थित राहीलेल्याने चर्चांना उधान
‘घरचं नको, तुरुंगातलेच पौष्टिक जेवण खा,’ राणा दाम्पत्याला कोर्टाने झापले