मोठी बातमी! प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा राजकारणातून संन्यास; कारण..

आज पश्चिम बंगालच्या निवडणूकांचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये मतता बॅनर्जी या तृणमुल काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाची नोंद करत आहे. असे असतानाच या विधानसभा निवडणूकीत मोलाचा असणारे ममता बॅनर्जी यांचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

राजकीय रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी निवृत्ती घेत, राजकारणाला रामराम ठोकला आहे. ते यावेळी एनडिटिव्हीशी बोलत होते. राजकारणातून संन्यास घ्यायची संधीच शोधत होतो, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जागांबद्दल भाकित केले होते. भाजप दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही, असे भाकित प्रशांत किशोर यांनी वर्तवले होते. जर भाजपने दोन अंकी आकडा पार केला, तर आपण संन्यास घेऊ, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते.

आता त्यांचे भाकित खरे ठरले असतानाही त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यामुळे सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु असून अनेकांनी त्यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्यसंधी शोधत होतो, पश्चिम बंगालच्या निमित्ताने ती संधी मिळाली असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

मला आता बाहेर पडायचे आहे. राजकीय रणनितीकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा राहिलेली नाही, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. तसेच आपण इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटीमधून बाहेर पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशांत किशोर यांनीच या कमिटीची सुरुवात केली होती. तसेच त्यांनी या कमिटीबीतही भाष्य केले आहे. या कमिटीमध्ये अनेक हुशार लोक असून ते योगदान देतील, पण मी यातून संन्यास घेत आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नंदीग्राममधल्या पराभवावर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
हॉलीवूडच्या ‘या’ दिग्दर्शकाची ऐश्वर्यावर होती वाईट नजर; अभिनेत्रीला एकटीला बोलवायचा रुमवर
आनंद महींद्रा राबवणार ऑक्सीजन ऑन व्हिल्सची भन्नाट मोहीम; घराघरात पोहोचवणार ऑक्सीजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.