Share

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाख देणार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची जाहीर ऑफर

Gunaratna Sadavarte : राज्य सरकारने शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यावर राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 5 जुलै रोजी संयुक्त मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) या वकिलांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “हे दोघं राजकारणासाठी मास्टरमाईंडसारखे काम करत आहेत. शिक्षणातील चुकीच्या निर्णयावर त्यांनी विजयाचा मेळावा जाहीर केला आहे, पण माझ्यामते हा ‘विजय मेळावा’ नसून ‘तांडव मेळावा’ आहे,” अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली.

सदावर्ते यांची ही भाषा मनसे (MNS) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांना अजिबात रुचली नाही. शिवसेना (उबाठा) गटाचे कार्यकर्ते प्रशांत भिसे (Prashant Bhise) यांनी थेट सदावर्तेंना कानाखाली मारणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. “सदावर्ते हे मराठी माणसाविरुद्ध बोलत आहेत. ते महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.

प्रशांत भिसे यांनी पुढे असंही म्हटलं की, “जो सदावर्तेंना कानाखाली मारेल, त्याला मी स्वतः 1 लाख रुपये रोख देईन.” काही दिवसांपूर्वीच मराठा समाज कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या घराबाहेरील गाड्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर आता हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली आहे.

याआधीही सदावर्ते यांच्या घराबाहेर काही मराठा समाज (Maratha Community) कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. आता हिंदी सक्तीच्या निर्णयावरून त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर केलीली जहरी टीका या संतापाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now