बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातील कलाकारांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक देखील केले होते. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi hasyjatra) कार्यक्रम पाहत असल्याचे देखील अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते.(prasad oak shear story to meet amitabh bacchan)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणारा अभिनेता प्रसाद ओक हा देखील त्यावेळी उपस्थित होता. नुकताच अभिनेता प्रसाद ओक याने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम पाहण्यास सांगितले असल्याची माहिती अभिनेता प्रसाद ओक याने दिली आहे.
मुलाखतीदरम्यान अभिनेता प्रसाद ओकने सांगितले की, “अमिताभ बच्चन मला म्हणाले की, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं एक स्किट रोज पाहिलं पाहिजे, असं मी मी अभिषेकला दररोज सांगतो. त्यातून बरंच काही शिकायला मिळेल”, हा किस्सा अभिनेता प्रसाद ओकने एका मुलाखतीत सांगितला आहे.
अभिनेता प्रसाद ओकने पुढे सांगितले की, ” अमिताभ बच्चन यांनी मला एक प्रश्न विचारला. तुम्हाला रिअक्शन लिहून दिल्या जातात ना? असं प्रश्न मला अमिताभ बच्चन यांनी विचारला. त्यावर मी नाही असं उत्तर दिलं. आम्हाला काहीही लिहून देण्यात येत नाही, असं मी अमिताभ बच्चन यांना सांगितले”, अशी माहिती अभिनेता प्रसाद ओकने मुलाखतीत दिली.
“यावर अमिताभ बच्चन मला म्हणाले की तुम्ही प्रत्येकवेळी नवीन रिअक्शन कशा देता? प्रत्येकवेळी नवीन प्रतिक्रिया. बरं त्या मजेशीर देखील असतात. मी तुमच्या जागी असतो तर मला हे जमलं नसतं. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती”, असे अभिनेता प्रसाद ओकने मुलाखतीत सांगितले. यावेळी अभिनेता प्रसाद ओकने अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन असल्याचे सांगितले.
अभिनेता प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाचे बॅनर सर्वत्र लागलेले दिसत आहेत. शिवसैनिकांसोबतच अनेक चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
‘आम्हीच ब्रम्हदेवाचे बाप आहोत’; शरद पवारांना पाठींबा देत मराठी अभिनेत्याची जाहीर पोस्ट
तेव्हा संपूर्ण ठाणे जळत होतं अन्…; आनंद दिघेंच्या आठवणीत अभिनेत्रीची भावूक पोस्ट
मोदी म्हणतात, ‘माझा धातू वेगळाच, दोनदा पंतप्रधान होणे पुरेसे नाही’; पवारांना लगावला टोला