Share

चक्क अमिताभ बच्चनलाही पडली महाराष्ट्राची हास्यजत्राची भुरळ, प्रसाद ओकने सांगितला किस्सा

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातील कलाकारांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक देखील केले होते. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम पाहत असल्याचे देखील अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते.(prasad oak share story about amitabh bacchan)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणारा अभिनेता प्रसाद ओक हा देखील त्यावेळी उपस्थित होता. नुकताच अभिनेता प्रसाद ओक याने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम पाहण्यास सांगितले असल्याची माहिती अभिनेता प्रसाद ओक याने दिली आहे.

मुलाखतीदरम्यान अभिनेता प्रसाद ओकने सांगितले की, “अमिताभ बच्चन मला म्हणाले की, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं एक स्किट रोज पाहिलं पाहिजे, असं मी मी अभिषेकला दररोज सांगतो. त्यातून बरंच काही शिकायला मिळेल”, हा किस्सा अभिनेता प्रसाद ओकने एका मुलाखतीत सांगितला आहे.

अभिनेता प्रसाद ओकने पुढे सांगितले की, ” अमिताभ बच्चन यांनी मला एक प्रश्न विचारला. तुम्हाला रिअक्शन लिहून दिल्या जातात ना? असं प्रश्न मला अमिताभ बच्चन यांनी विचारला. त्यावर मी नाही असं उत्तर दिलं. आम्हाला काहीही लिहून देण्यात येत नाही, असं मी अमिताभ बच्चन यांना सांगितले”, अशी माहिती अभिनेता प्रसाद ओकने मुलाखतीत दिली.

“यावर अमिताभ बच्चन मला म्हणाले की तुम्ही प्रत्येकवेळी नवीन रिअक्शन कशा देता? प्रत्येकवेळी नवीन प्रतिक्रिया. बरं त्या मजेशीर देखील असतात. मी तुमच्या जागी असतो तर मला हे जमलं नसतं. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती”, असे अभिनेता प्रसाद ओकने मुलाखतीत सांगितले. यावेळी अभिनेता प्रसाद ओकने अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन असल्याचे सांगितले.

अभिनेता प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाचे बॅनर सर्वत्र लागलेले दिसत आहेत. शिवसैनिकांसोबतच अनेक चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
संभाजीराजांना ठार मारणाऱ्या, मंदीरे पाडणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?
“अमिताभ बच्चन अभिषेकला रोज महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सांगतात”, प्रसाद ओकने शेअर केला भन्नाट किस्सा
PHOTO: सिद्धार्थसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ खास व्यक्तीसोबत कियारा गेली डेटवर, म्हणाली, ‘बेस्ट ब्रेकफास्ट डेट एवर’

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now