Share

Prasad Lad: “ही निवडणूक मी एकट्याने जिंकली, भाजपने मदत केली नाही, ब्रँड ठाकरे म्हणजे भोपळा” – प्रसाद लाड

Prasad Lad : बेस्ट एम्प्लॉयीज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (BEST Election 2025) निवडणुकीत अपेक्षेपेक्षा वेगळाच निकाल समोर आल्यानंतर मुंबईतला राजकीय पारा चांगलाच चढला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. तब्बल नऊ वर्षांपासून चालत आलेली सत्ता या पराभवामुळे त्यांच्या हातातून गेली.

या पार्श्वभूमीवर भाजप (Bharatiya Janata Party) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही निवडणूक मी माझ्या श्रमिक उत्कर्ष सभा (Shramik Utkarsh Sabha) या पॅनेलच्या माध्यमातून एकट्याने लढलो. भाजपनं यामध्ये कोणतीही मदत केली नाही.” त्यांनी ठाकरेंच्या ‘ब्रँड’वर जोरदार शब्दांत हल्ला चढवत “ब्रँड ठाकरे म्हणजे भोपळा” अशी कडवी टीकाही केली.

“मुंबई आमची, मराठी आमची म्हणणाऱ्या ब्रँडचा धुवा उडाला”

प्रसाद लाड म्हणाले की, सात किंवा नऊ जागा मिळाल्या यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे “ज्यांनी मोठमोठी भाषणं केली, मुंबई आमची, मराठी आमची म्हणणारे, त्यांनी एकही जागा जिंकू शकली नाही.”
त्यांच्या मते, ठाकरे ब्रँडचा पूर्ण धुव्वा उडाला, आणि निवडणुकीचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न उलट ठाकरे बंधूंवरच परिणाम झाला.

“सहकार चालवणं सोपं नाही, निव्वळ आरोप करण्याने समाज स्वीकारत नाही”

लाड पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्र चालवण्यासाठी मेहनत आणि जाण आवश्यक असते. संजय राऊत (Sanjay Raut) आणि संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना उद्देशून त्यांनी म्हटलं – “केवळ आरोप करणं सोपं असतं, पण एखादी संस्था उभी करून दाखवणं अवघड असतं.” त्यांच्या मते, ठाकरे गट आणि मनसे (MNS) ने एका संस्थेसाठीही कधी मेहनत केली नाही, त्यामुळे मुंबईतील कामगार आणि मराठी जनतेने त्यांना जागा दाखवली.

या निवडणुकीतील 2,158 मतं अवैध ठरली आहेत. त्यावर भाष्य करताना प्रसाद लाड म्हणाले की, “या पैकी जवळपास 1,700 मतं माझ्या पॅनेलची होती. ती वैध ठरली असती तर सात जागांचा आकडा १७ वर गेला असता.”
त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन मोजणी पुन्हा करण्याची मागणीही केल्याचं सांगितलं.

“शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळले”

लाड यांनी यावेळी शिवसेनेच्या (Shiv Sena) कारभारावरही टीका केली. “चार–सहा कोटींचे बंगले २४ कोटींना घेतले. कार्यालयासाठी पैसे उधळले. बेस्ट (BEST) कामगारांनी या सर्व भ्रष्टाचाराला मतांद्वारे कठोर उत्तर दिलं”, असं ते म्हणाले.

निकालातलं चित्र

पॅनेल जागा
शशांकराव पॅनेल (Shashankrao Panel) 14
श्रमिक उत्कर्ष सभा – प्रसाद लाड (Shramik Utkarsh Sabha – Prasad Lad) 7
उत्कर्ष पॅनेल – ठाकरे बंधू (Utkarsh Panel – Thackeray Brothers) 0

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now