छोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’ मालिकेत करणार काम

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वीरित्या प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे पार्थना बेहेरे होय. तिचे या क्षेत्रात पदार्पण झाले ते ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेत तिने अर्चना लोखंडेच्या महान बहिणीची भूमिका साकारली होती.

पार्थनाला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘मितवा’ चित्रपटातून. याच चित्रपटामधून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने एकामागून एक असे अनेक चित्रपट केले. तिने लागोपाठ अनेक चित्रपट केले आणि चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

पार्थना आता अनेक दिवस मनोरंजन सृष्टीपासून लांब होती. परंतु आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. तिला पुन्हा रोज पाहता येणार यासाठी तिचे चाहते प्रचंड खुश आहेत.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून पार्थना बेहेरे लवकरच घराघरात पोहचणार आहे. या मालिकेचा प्रोमो मागील काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या प्रोमो मध्ये पार्थना बेहेरेचा चेहरा दाखवला गेला नाही. परंतु तीच या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत पार्थना बेहेरे सोबत मुख्य भूमिकेत बॉलीवूड सुपरस्टार श्रेयस तळपदे पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही प्रसिद्ध स्टार छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.

एका मुलाखतीत अभिनेत्री पार्थना बेहेरेने तिच्या करियरबाबत सांगितले आहे. त्यामध्ये ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याबाबत देखील मत मांडले आहे. तिने त्यामध्ये सांगितले की, मागील दोन वर्षापासून मला मालिकांच्या खूप ऑफर येत होत्या. परंतु तेव्हा मी केवळ चित्रपटांत काम करण्याचे ठरवले होते. म्हणूनच मालिकांना जाणून बुजून नकार देते होते.

परंतु गेल्या दोन वर्षात मी कोणत्याही चित्रपटात काम केले नाही त्यामुळे चाहत्यांकडून मी चित्रपटात कधी दिसणार का प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की प्रेक्षकांना मला पहायचे आहे. त्यामुळेच प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेतून पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रार्थना बेहेरे एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जसे की, मितवा, कॉफी आणि बरच काही, ती आणि ती, लव्ह यू जिंदगी, असे अनेक हिट चित्रपट पाहायला मिळतात.

हे ही वाचा-

नवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ही भयंकर शिक्षा, वाचून धक्का बसेल

क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाणी कामगिरी

महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.