धक्कादायक! UPSC परीक्षा उत्तीर्ण प्रांजलची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

कोरोनाने सध्या देशात हाहाकार उडवला असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या देखील वाढत आहे. अनेकांवर वेगवेगळ्या प्रकारे कोरोनाचे संकट येत असून घरातील अनेकांचे मृत्यू होऊन संपूर्ण कुटुंब संपल्याच्या घटना देखील समोर येत आहेत.

आता अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पातुर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे सगळ्यांना एकच धक्का बसला आहे.

हैदराबाद येथील रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे प्रांजलचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधूरे राहिले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे त्याचे फुफ्फुस निकामी झाले होते. आठवडाभरापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याला ५५ लाख रुपये जोडून उपचार करण्यासाठी एअर एम्बूलंसद्वारा हैदराबादच्या यशोदा हास्पिटलला हलवले होते. तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता. मात्र अचानक प्रांजलचा मृत्यू झाला. प्रांजलने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि कठोर परिश्रमातून यूपीएससी ही परीक्षा पास केली.

सुरुवातीला त्याला अकोल्याच्या खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्येत अत्यंत गंभीर झाली. अकोल्याच्या डॉक्टर सतीश गुप्ता यांच्या मदतीने हैदराबादच्या माणसाच्या फुफ्फुस वर काम करणाऱ्या यशोदा हॉस्पिटलचा शोध घेतला आणि संपर्क साधला. घरच्यांनी पैसे जमवले आणि त्याला हेद्राबादला हलवले.

सर्व तयारी करून हैदराबादच्या पाच डॉक्टरांसह ॲम्बुलन्सद्वारे एका तासामध्ये हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तेथे डॉ. जिंदाल आणि चमुने प्रांजल वर उपचार केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. यामुळे अनुराधा नाकट आणि प्रभाकर नाकट यांना एकच धक्का बसला.

ताज्या बातम्या

बाबो! आकाशातून पडलेल्या १०३ किलोच्या दगडाने मेंढपाळ झाला करोडपती; वाचा पुर्ण किस्सा

माधुरी दीक्षितच्या आई वडिलांनी सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.