दिग्दर्शकाने Action म्हणताच अभिनेते प्राणने किशोर कुमारच्या कानाखली वाजवली आणि…

अभिनेते प्राण आणि किशोर कुमार इंडस्ट्रीतील प्रभावशाली अभिनेते होते. त्याकाळी इंडस्ट्रीमध्ये त्यांचा चांगलाच दबदबा होता. प्राण यांनी चित्रपटांमध्ये नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारच्या भुमिका साकारल्या आहेत.

तर दुसरीकडे किशोर कुमारला ऑल इन वन स्टार बोलले जायचे. किशोर कुमार अभिनेते आणि गायकच नाही तर उत्तम लेखक, दिग्दर्शक, निर्माते देखील होते. त्यांना फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक काम अतिशय चांगल्या प्रकारे जमत होते.

चांगल्या कामासोबतच किशोर कुमार त्यांच्या विचित्र स्वभावामूळे देखील नेहमी चर्चेत असायचे. त्यांना कधी राग येईल आणि ते कधी मस्करी करत असतील हे सांगता येत नव्हते. त्यांच्या अशा स्वभावाबद्दल इंडस्ट्रीतील सगळ्या लोकांना माहीती होते.

चित्रपटाच्या सेटवर देखील अनेकदा ते असेच वागायचे. त्यामूळे निर्मात्यांना शुटींग करायला अडचणी निर्माण होत होत्या. एकदा तर त्यांच्या या स्वभावाला कंटाळून अभिनेते प्राण यांनी त्यांच्या कानाखाली वाजवली होती. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

१९५५ मध्ये रिलीज झालेल्या ‘पहली झलक’ चित्रपटामध्ये प्राण आणि किशोर कुमार एकत्र काम करत होते. चित्रपटाची शुटींग पुर्ण होत आली होती. फक्त काही दिवसांचे शुट बाकी होते. या दिवसांमध्ये प्राण आणि किशोर कुमारचे अनेक सीन एकत्र शुट होणार होते.

शुटींग पुर्ण करुन सर्वांना घरी जायची घाई होती. पण किशोर कुमारमूळे शुटींग पुर्ण होत नव्हती. कारण एका सीनमध्ये प्राण किशोर कुमारला मारतात आणि त्यामूळे त्यांना दुखी हावभाव आणि रडायचे दाखवायचे होते. पण किशोर कुमार मात्र मस्करीच्या मुडमध्ये होते.

सीन सुरु झाल्यानंतर किशोर कुमारने हासायला सुरुवात केली. सीन सुरु झाल्यानंतर प्राण त्यांना खोटं खोटं मारत होते. पण ते अभिनय रडायच्या जागी हसत होते. त्यामूळे अनेक वेळा रिटेक घ्यावे लागत होते. हे बघून सेटवरील सर्वजण चिडले.

सेटवरील सगळे लोकं वैतागले होते. सर्वांना शुटींग पुर्ण करुन लवकर जायचे होते. पण शेवटपर्यंत किशोर मात्र व्यवस्थित अभिनय करत नव्हते. त्यामूळे दिग्दर्शकाने प्राणला सांगितले की, किशोर कुमार ऐकत नाहीत. एक काम करा तुम्ही त्यांना खरं खरं मारा ज्यामूळे ते सीन पुर्ण करतील.

प्राणने देखील दिग्दर्शकाचे म्हणणे ऐकले. सीन सुरु झाल्यानंतर त्यांनी खरचं किशोर कुमारच्या जोरदार कानाखाली वाजवली. त्यामूळे त्यांनी बरोबर हावभाव दिले आणि सीनची शुटींग पुर्ण केली. त्यांच्या वागण्यामूळे त्यांना मार खावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या –

१३ वर्ष मोठ्या आणि विवाहीत नसीरुद्दीनच्या प्रेमात पडल्या होत्या रत्ना पाठक

…म्हणून अलका याग्निक यांनी बॉलिवूडला ठोकला रामराम, समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

शशी कपूर आणि पत्नी जेनिफरचा ‘हा’ किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल

‘नॅशनल क्रश’ रश्मिका दिसली शेतात नांगर चालवताना, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.