“दोन कानाखाली लावेल”; आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या मुलाला भाजप खासदाराची धमकी

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येताना दिसून येत आहे. अशात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन मिळत नसल्याने मृत्युही होत आहे.

अशा परिस्थितीत एक संतापजनक घटना घडली आहे. आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या तरुणाला भाजप खासदाराने थेट दोन कानाखाली लावण्याची धमकीच दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आपल्या आईसाठी ऑक्सिजन मागवणाऱ्या व्यक्तीला दोन कानाखाली लावण्याची धमकी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रल्हाद सिंग पटेल यांनी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.

प्रल्हाद सिंग पटेल रुग्णालात पाहणीसाठी आले होते. रुग्णालात ऑक्सिजनचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे एक तरुण आईसाठी ऑक्सिजन मागत होता. तसेच तिथल्या ऑक्सिजन परिस्थितीबाबत तक्रार करत होता. त्यावेळी प्रल्हाद सिंग पटेल त्या तरुणावर संतापले आहे.

संबंधित व्यक्तीने वापरलेली भाषा पाहून प्रल्हाद सिंग चांगलेच भडकले होते. त्यामुळे ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला धमकी देत दोन कानाखाली लावेल असे म्हणतानाही प्रल्हाद सिंग पटेल दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून प्रल्हाद सिंग पटेल यांच्या धमकीमुळे नेटकरी त्यांच्यावर टिका करत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात प्रल्हाद सिंग पटेल हे गायब असल्याची वारंवार टीका होत होती. त्यानंतर ते आता पाहणीसाठी पोहचले होते. गुरुवारी ते सरकारी रुग्णालयात पोहचले असता असा प्रकार घडला आहे. तसेच या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देत ती व्यक्ती डॉक्टरांसाठी आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याने मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो, असे प्रल्हाद सिंग पटेल यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ बॉलीवूड कलाकारांच्या मुलांनी आत्तापर्यंत त्यांचे चित्रपट कधीच पाहिले नाहीत कारण…
घरी उपचार घेत असाल आणि ऑक्सीजन कमी होऊ लागला, तर करा ‘हा’ उपाय, जाणून घ्या
ऑक्सीजनअभावी आणि ICU बेड न मिळाल्याने होणारे मृत्यू हे केंद्र सरकारचे पाप- राहूल गांधींचा थेट आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.