‘आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करा, व्हायरस पसरावयचं थांबवा’

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला. पण काही ठिकाणी तृणमुल काँग्रेसला लक्ष्य करत भाजपने असा दावा केला होता की आम्ही २०० पेक्षा जास्त जागा जिंकू. पण त्याउलट झाले आणि मतदारांनी तृणमुल काँग्रेसला भरभररून मते दिली.

पश्चिम बंगालच्या विजयासाठी भाजपने खुप जोर लावला होता. पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळाला नाही. भाजपच्या जागा सुरूवातीला वाढताना दिसत होत्या पण नंतर तृणमुल काँग्रेसने आघाडी घेतली आणि भाजपच्या जागा त्यानंतर वाढल्याच नाहीत.

फक्त नंदीग्राममध्ये भाजपला विजय मिळाला आहे. नंदीग्राम ही महत्वाची जागा माणली जात होती पण ममता बॅनर्जी यांना ती जिंकता आली नाही. दरम्यान निकाल तृणमुल काँग्रेसच्या बाजूने लागताना दिसताच प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, डन ऍन्ड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवण थांबवा. नागरिकांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा. जीवन महत्वाचं आहे, असं म्हणत प्रकाश राज यांनी मोदींना टोला लगावला आहे.

अनेकांनी मोदींवर टीकेचे झोड उठवले आहेत. दरम्यान, सुरूवातीचे कल जेव्हा हाती आले होते तेव्हाच स्पष्ट झाले होते की विजय हा ममता बॅनर्जींचा होणार आहे. ममता बॅनर्जींनी विजयाची हॅट्रीक करत भाजपला धुळ चारली आहे.

तृणमुल काँग्रेसला स्पष्टपणे बहुमत मिळाले आहे. भाजपला १०० च्या पुढे जागा मिळवण्यासाठी कसरत करावी लागत होती. राजकीय वर्तुळात सध्या फक्त निकालांची चर्चा सुरू आहे. भाजपने या निवडणूकीसाठी सगळा जोर लावला होता पण ममता बॅनर्जीही तयारी करून मैदानात उतरल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या
नंदीग्राममधल्या पराभवावर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
हॉलीवूडच्या ‘या’ दिग्दर्शकाची ऐश्वर्यावर होती वाईट नजर; अभिनेत्रीला एकटीला बोलवायचा रुमवर
भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या मोठ्या व्यक्तिने राजकारणाला ठोकला रामराम
“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता करेक्ट कार्यक्रम कोणी केला?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.