राजेश टोपेंनी थेट पुराव्यासह आकडेवारी देऊन जावडेकर व मोदी सरकारची केली पोलखोल

 

 

राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे, पण केंद्राने दिलेले डोस राज्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने कमी पडत असल्याचे राज्य सरकारकडून म्हटले जात आहे.

राज्याला मिळालेल्या लसीच्या डोसवरुन विरोधी पक्षात आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच झडत सुरु आहे. असे असताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये, असे म्हटले आहे. आता याच ट्विटचे उत्तर देत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रकाश जावडेकरांवर निशाणा साधला आहे.

लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे, असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे.

तसेच आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा, असे म्हणत राजेश टोपे यांनी प्रकाश जावडेकर यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये, आजच्या तारखेपर्यंत १ कोटी ६ लाख १९ हजार १९० लसी महाराष्ट्राला पोहोचल्या. यातील ९० लाख ५३ हजार ५२३ लसी वापरण्यात आल्या. ६ टक्के लस फुकट गेली. ७ लाख ४३ हजार २८० लस पाईपलाईनमध्ये आहे, असे ट्विट प्रकाश जावडेकरांनी केले होते, आता त्याच आकडेवारीच्या ट्विटला राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“सचिन वाझे प्रकरणात माझीही चौकशी करा आणि दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या”

पैशांची कमी नाही तरी या गावातील लोक कपडेच घालत नाहीत, पर्यटकांनाही कपडे काढूनच जावे लागते

आपल्या सासरच्या माणसांसोबत ऐश्वर्या रायचे आहेत ‘असे’ संबंध; ननंद श्वेतासोबत असे बॉण्ड करते शेअर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.