Share

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा खासदारकी मिळणार? राजकीय घडामोडींना वेग

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस(Congress) पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.(Prakash Ambedkar will get Rajya Sabha MP from Congress)

काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांची भेट झाली होती. या भेटीत राज्यसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर आंबेडकर कुटुंबाशी एकनिष्ठ असलेली व्होट बँक आपल्याकडे येईल, अशी काँग्रेसचे म्हणणे आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी सध्या तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेस पक्षाचे पी. चिदंबरम तसेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत लवकरच संपणार आहे. तसेच भाजप पक्षातील विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे आणि पियुष गोयल यांची देखील राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपणार आहे. या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे.

यासाठी उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून देखील प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पियुष गोयल सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत.

त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपकडून पियुष गोयल यांनाच पुन्हा संधी दिली जाऊ शकते. राज्यसभेसाठी महाराष्ट्रामधून १९ सदस्य निवडले जातात. यामध्ये भाजप पक्षाचे सात, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेकडून तीन, काँग्रेस पक्षाचे तीन, रिपाईचे एक आणि अपक्ष एक असे १९ खासदार आहेत. आता प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरे पुण्यातून निघताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यालयातच भिडले नेते
राजेशाही थाटात पार पडला PSI पल्लवी जाधवचा विवाह सोहळा, जाणून घ्या तिची संघर्षकथा..
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणला मोदींनी आवरावे अन्यथा…आता निर्वाणीचा इशारा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now