Share

Prakash Ambedkar : मोदींच्या जागी मी असतो तर ‘पुतिन’ नीती वापरली असती; प्रकाश आंबेडकरांनी केल्या खास सुचना

Prakash Ambedkar : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर((Prakash Ambedkar) यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करत केंद्र सरकारवर थेट कारवाईची मागणी केली. त्यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना(narendra modi) आक्रमक धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले.

“जर मी पंतप्रधान असतो तर रशियाच्या युद्धनीतीचा अवलंब केला असता. रशियाने युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट केलं, कारण त्यांना दीर्घकालीन धोका नको होता. तशीच नीती पाकिस्तानविरोधात वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढच्या ३० वर्षांत तो मागे फेकला जाईल,” असे आंबेडकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान आर्मीचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, परंतु सरकार पॉलिटिकल इच्छाशक्तीअभावी कारवाई करत नाही. “मिलिट्री कारवाईस तयार आहे, पण राजकीय नेतृत्व कच खात आहे. एकदा निर्णय घेतला की जनता त्याचा परिणाम सहन करण्यास तयार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

हल्ल्याच्या अनुषंगाने आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) इंटेलिजन्स यंत्रणांच्या अपयशावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “हल्लेखोर कुठून आले, कुठे गेले याची माहिती सरकारकडे नाही. अशा स्थितीत थेट मिलिट्रीला आदेश द्यायला हवेत,” अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रपती हेच आर्मीचे सर्वोच्च प्रमुख असल्यामुळे त्यांच्या आदेशांशिवाय कारवाई होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारला अशी नीती आखण्याचे आवाहन केले की जी पाकिस्तानच्या विस्तारवादी हेतूंना आळा घालेल.

काश्मीरच्या पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करत, आंबेडकरांनी सांगितले की, प्रत्येक राज्याने आपल्या भागातील पर्यटकांना काश्मीरला पाठवण्याची व्यवस्था करावी. “महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर मी स्वतः फडणवीस यांना घेऊन जाण्याची जबाबदारी घेईन,” अशी तयारी त्यांनी दर्शवली.
prakash-ambedkar-urges-narendra-modi-to-adopt-aggressive-policy

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now