Share

Prakash Ambedkar : “बाळासाहेब ठाकरेंमध्ये असलेला दिलदारपणा नरेंद्र मोदींमध्ये नाही”

Sharad-pawar-Narendra-Modi

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदी आणि पवारांवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांकडे असलेला मनाचा मोठेपणा मोदी आणि पवारांकडे नाही असे ते म्हणाले आहेत. ते अकोला येथील कार्यक्रमात बोलत होते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भर पावसात उपस्थित लोकांना संबोधित केले.

या कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंमध्ये असलेला दिलदारपणा नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये नाही. तसेच राजकीय वैर न ठेवता जो मनाचा मोठेपणा बाळासाहेबांमध्ये होता, तो मोदी आणि पवारांमध्ये नाही असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

हे बोलत असताना त्यांनी बाळासाहेबांचा एक किस्साही सांगितला होता. बाळासाहेबांची महती सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या ३८ वर्षांपासून अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करण्यात येत असतो. ३८ वर्षांपासून प्रकाश आंबेडकर हे या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते असतात. यावर्षीही त्यांनी अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर भर पावसात भाषण केले.

यावेळी त्यांनी भाजपबरोबरच काँग्रेसवरही जोरदार टीका केली. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष असते. आता यावर्षीसुद्धा मोदी आणि पवार यांच्यावरील टीकेमुळे त्यांचे भाषण चर्चेत आले आहे.

महत्वाच्या बातम्या
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; या बड्या नेत्याने शिवसेनेत केला पक्षप्रवेश, प्रकाश आंबेडकरांवरही केले गंभीर आरोप
pm narendra modi : “नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय”, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सुचक विधान
..तर गुजराती व्यापाऱ्यांची अवस्था बिकट होईल; राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी सांगीतले कडवे सत्य

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now