‘लॉकडाऊन हे राजकीय हत्यार, १०० कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून लॉकडाऊन’

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

याचाच धागा पकडत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. ‘लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. १०० कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘जनतेने १०० टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी द्यावी, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

‘आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने ५० टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिला आहे. ती फाईल ती मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“चौकीदार ही चोर है सिद्ध झाले आहे”; फ्रान्सच्या ‘त्या’ रिपोर्टवरून नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात

आंबेगावचे सुपुत्र शरद पवारांचे सर्वात विश्वासू दिलीप वळसे पाटील झाले महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.