Share

लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी का गायली नाही? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. (prakash ambedkar on lata mangeshkar)

वयाच्या ९२ व्या वर्षी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपुर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकरांच्या निधनानंतर अनेत दिग्गज नेते मंडळी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही अनेक कलाकार उपस्थित होते.

लतादीदींच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. असे असताना प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांनी लता मंगेशकरांवर एक टिप्पणी केली आहे. लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होत.

लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी का गायली नाही, हे त्यांना जीवंत असताना विचारायला हवं होतं, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. इतकंच नाही, तर जशी त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, तशी त्यांनी नेहरु आणि सरदार पटेलांचीही गाणी गायली नाही, प्रत्येकाची प्रिन्सिपल्स असतात, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

दरम्यान, शाहरुख खानच्या फुंकरमुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्याने फुंकर नाही तर तो लता मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकला असे अनेकांनी म्हटले. त्यामुळे शाहरुख खानवर अनेकांनी टीका केली होती. आता टीका करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मी मुस्लिम व्यक्तींच्या अंत्ययात्रांना गेलो आहे. मी बघितलंय की अनेक ठिकाणी फुंकर घातली जाते. हे देशाचं वैविध्यपुर्ण कल्चर आहे. ते सर्वांनी स्विकारायला हवं. ज्यांना पटत नसेल त्यांनी शांत रहावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी ट्रोल करणाऱ्या लोकांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
40 हजारांच्या व्याजापोटी वसूल केले 8 लाख; सावकाराने वृद्ध महिलेला अक्षरश भीक मागायला लावली
ह्युंदाईनंतर केएफसीनेही केले काश्मीरबद्दल ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, भारत सोडून निघून जा तुम्ही
अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बांधणार लग्नगाठ? ‘या’ ठिकाणी होणार थाटामाटात लग्न

राजकारण

Join WhatsApp

Join Now