गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुका एकत्र लढण्यास ते इच्छुक आहेत. त्यांच्यात तशा चर्चेच्या फेऱ्यादेखील झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सहभागी होण्यास हिरवा कंदील देत आगामी निवडणुका आपण सर्वजण मिळून लढू, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांचाही विरोध मावळला आहे.
दरम्यान, काल रात्री वंचित बहुजन अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अडीच तास बंद खोलीत संभाषण झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंशी युतीसाठी चर्चा सुरू असतानाच त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक घेतली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड अडीच तास काय चर्चा झाली?
आगामी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत दिसणार का, याचे उत्तर या बैठकीत दडलेले असू शकते. अडीच तास चाललेल्या या बैठकीमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या सततच्या बैठकांमुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की, ही शिंदे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील युतीची चिन्हे आहेत काय?
एकीकडे उद्धव ठाकरेंशी युतीची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे येथेही त्याची चर्चा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय असणार हे गुलदस्त्यात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनाही शिंदे यांनी ऑफर दिली होती. ही बैठक त्यातील एखाद्या अटीबद्दल आहे का? एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांना आपल्याकडे आणतील का? या सर्व प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.
प्रकाश आंबेडकरांच्या गोटातून सांगीतले जात आहे की ही बैठक इंदूमिलच्या प्रलंबीत कामाविषयी झाली आहे. तर काहीजन म्हणत आहेत की एकनाथ शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांना शिंदे गटात खेचण्यासाठीच ही बैठक बोलावली होती. त्यांनी सर्वच दलित पक्षांना शिंदे गटात आणण्याची ऑफर दिली आहे.
यापुर्वीच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी शिंदेगटासोबत हातमिळवणी करत युतीची घोषणा केली आहे. त्यांच्या युतीनंर आरपीआयचे नेते रामदास आठवले मात्र प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी भाजप नेत्यांना भेटून नाराजी सांगणार असल्याचे जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
ठाकरेंचे एकाच दगडात तीन निशाणे, शेट्टी मानेंसह वंचितलाही दिला दणका; लाखो मते घेतलेला नेता फोडला
prakash ambedkar : तर ‘या’ प्रकरणामुळे शिवसेनेवरही शिंतोडे उडतील; प्रकाश आंबेडकरांनी सांगीतला मोठा धोका