नरेंद्र मोदी दारूडे, देश विकायला काढलाय त्यांनी – प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

मुंबई | सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र बिघडत चालले आहे. अशात देश कोरोनाच्या विळख्यात अडकलेला आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

देशावर आलेल्या या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाण साधला आहे.

मोदींवर निशाणा साधत प्रकाश आंबेडकरांनी मोदींची तुलना थेट एका दारुड्याशी केली आहे. दारुड्या हा जवळचे सगळे संपले की घर विकायला काढतो, तसाच प्रकार मोदींकडून सुरू आहे, ते पंतप्रधान नसून दारुडे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

तसेच कोरोना विषाणूमुळे देश अडचणीत सापडला आहे, हे कारण देत नरेंद्र मोदी विमानतळे विकायला काढत आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

राज्यातल्या काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रकाश आंबेडकर हे अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणीसाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठराविक जिल्ह्यांमधील काही भागांचीच पाहणी करण्यापेक्षा सर्वच नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला पाहिजे. तसेच नुकसानग्रस्तांना खावटी योजनेतून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

दादा कोंडकेंचा गिनीज बुकमध्ये नोंदवलेला ‘तो’ वर्ल्ड रेकाॅर्ड मोडने अजून कुणालाही जमलेले नाही

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका खऱ्या आयुष्यात आहे एकदम माॅडर्न

कडक सल्युट! तीन चिमुकल्यांनी सर केले महाराष्ट्रातील सर्वोच्च ‘कळसुबाई शिखर’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.