‘दिपाली चव्हाणाच्या आत्महत्येच्या मुळाशी वाघ आणि सागवान तस्कर’

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपुर्वी दिपाली यांनी सुसाइड नोट लिहून उप वन संरक्षक(DFO) विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

याच प्रकरणावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मुळाशी मेळघाट आणि धारणी क्षेत्रातील वाघ आणि सागवान तस्कर असल्याचा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘धारणी आणि मेळघाटमधील वाघ कमी होणे, वाघाची तस्करी, सागवानाची अवैध विक्री यातूनच दिपाली यांना या साखळीनं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आंबेडकर म्हणालेत.

यासंदर्भात आंबेडकरांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात आठवडाभरात सरकारनं ठोस कारवाई न केल्यास पुरावे सार्वजनिक करण्याचा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मुळाशी वाघ तस्कर असल्याचं सांगताना आंबेडकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

स्वत:ला वाघ समजणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता असलेल्या सरकारच्या काळातही वाघ तस्करांच्या कारवाया सुरूच असल्याने ‘हे सरकार वाघांचं की लांडग्यांचं?’, असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का? FIRशिवाय सीबीआय चौकशी कशी? परमबीरसिंगांना कोर्टाने फटकारले

सोमी अलीने एवढ्या वर्षांनंतर सांगितले तिच्या आणि सलमान खानच्या ब्रेकअपचे खरे कारण

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी केला बलात्कार, पीडितेचा पत्रकार परिषदेत आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.