खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीच्या रॅकेटची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई : ‘ठाकरे सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवं सरकार आलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षांमध्येही सत्तेत होते. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत, असे नव्हे. पण उद्धव ठाकरे यांना कणा नाही. त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीचं रॅकेट सुरू झालं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह आल्याचा प्रकार अमरावतीत समोर आला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार ८० % लोक यांना सिमटम्स नाहीत. ते लोक घरात राहू शकतात असं म्हणणं आहे. लॉकडाऊन असतांना सुद्धा रुग्ण संख्या वाढलीय. लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॉकडाऊनला माझा विरोध आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, ‘पंतप्रधान मोदींच आदेशांची पायमल्ली करत आहेत. तिथं एकाही पोलिसांनी मोदींवर केस केली नाही. माझं आवाहन आहे त्यांनी मोदींवर केस करून दाखवावी.

बंगालच्या लोकांना मोदी वारंवार तिथं जाऊन त्यांना डिवचत आहेत. ज्या ज्या वेळी तिथं जाऊन प्रचार करतील तेव्हा ममता यांच्या पाच सीट वाढत जातील, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

मिठाचा खडा टाकू नये; अजित दादांनी मोजक्या शब्दात संजय राऊतांना सुनावले

उलट उत्तर देणाऱ्या मिथून चक्रवर्तीचा राजकुमारने असा अपमान केला की, त्यांनी रडायला केली होती सुरुवात

पुस्तक वाचण्यात मग्न असलेल्या सारा अली खानवर चाहते झाले फिदा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.