सध्या मराठी मधील ‘रानबाजार’ या वेबसिरीजची जोरदार चर्चा आहे. रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये मराठी कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत. या वेबसिरीजमध्ये अभिनेते मोहन आगाशे, सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajkta Mali) यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.(prajkta mali talk about role in webseries)
रानबाजार’ ही मराठीतील सर्वात बोल्ड सिरीज असल्याचे संगितले जात आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी बोल्ड सीन दिले आहेत. ‘रानबाजार’ वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिलेल्या किसींग सीनची देखील सध्या चर्चा होत आहे. या वेबसिरीज मधल्या बोल्ड सीनवरून सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना ट्रोल करण्यात येत आहे.
या ट्रोलिंगवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने भाष्य केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने ट्रोलर्सना देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. “यापूर्वी देखील मला वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. पण अनावश्यक बोल्ड सीनमुळे वेबसिरीजमध्ये मी दिसले नाही.”, असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी पुढे मुलाखतीत म्हणाली की, “बोल्डनेस कथेची गरज असेल, तर ठीक आहे. पण बोल्ड दृश्यांमुळे प्रेक्षक वाढतील असं लॉजिक लावलं जात. ते कळणं अवघड आहे”, असे देखील अभिनेत्री प्राजक्ता माळीने सांगितले. सध्या वेबसिरीजमध्ये बोल्ड कंटेंट वाढत आहे. यावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीला प्रेक्षकांनी आजपर्यंत सोज्वळ आणि गोंडस भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण ‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये प्राजक्ता माळी एका नव्या रूपात दिसत आहे. अनेकांनी या वेबसिरीजमधील भूमिकेवरून अभिनेत्री प्राजक्ता माळीचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या वेबसिरीजसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्लॅनेट मराठी या निर्मिती संस्थेने ‘रानबाजार’ वेबसिरीजची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील प्रमुख भूमिकेत आहे. अभिजित पानसे यांनी ‘रानबाजार’ या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा होत आहे. प्लॅनेट मराठी अँपवर ही वेबसिरीज आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
कभी ईद कभी दिवाली: सलमान खानला त्याच्या चित्रपटासाठी मिळाला साऊथमधील ‘हा’ खतरनाक विलेन
ऐश्वर्याने 30 वर्षांपुर्वी फक्त ‘एवढ्या’ पैशासाठी केले होते काम, 1992 च्या बिलाचा फोटो झाला व्हायरल
जो जिता वहीं सिंकदरच्या साईड रोलसाठी केलं रिजेक्ट, आज आहे बॉलिवूडचा नंबर वन खिलाडी