प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीची(Prajkta Mali) महत्वाची भूमिका असलेला ‘वाय’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच एका खास फोटोशूट केलं आहे.(prajkta mali new saree photo viral on social media)
या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने काळ्या रंगाच्या साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी नो ब्लाउज लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने लक्षवेधी दागिने घातलेले पाहायला मिळतात.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने हे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मेरे तो नैनों में किरणों के पाँखी.” अनेक युजर्सनी या फोटोला लाईक देखील केले आहे.
अनेकांनी या फोटोंवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे की, “काय ती अदा, काय ते सौंदर्य.” तसेच दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “प्राजक्ता या नवीन लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.” अभिनेत्री प्राजक्ता माळीचे ह्या फोटोशूटमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमधील कपडे परिधान करत असते. काही वेळा यामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. या वेबसिरीजमधील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले होते.
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे. ती नेहमीच तिचे व्यायाम करत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूर्यनमस्कार करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. अभिनेत्री प्राजक्ता माळीने न थकता तब्बल १०८ सूर्यनमस्कार केल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मोठा वाद, संजय राऊत बाहेर पडले न बोलताच निघून गेले
लोकसंख्येचा होतोय विस्फोट, भारताची परिस्थिती गंभीर, ‘या’ धर्माची लोकं आहेत सर्वात जास्त
…नाहीतर बिश्नोई गँग सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई मागे हटायला तयार नाही