अलकाताई तुमच्या मुलींसोबत ती घटना घडली असती तर? प्राजक्ताने सांगीतला तो भयानक अनुभव

सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत आर्या साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडला निर्मात्या अलका कुबल यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांनी अनेक आरोप प्राजक्तावर केले आहेत. आता त्या आरोपांना प्राजक्ताने उत्तरे दिली आहेत. “त्यांच्या मुलींच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर मला खात्री आहे की त्या गप्प बसल्या नसत्या.” असे प्रतिउत्तर तिने दिली आहेत.

आरोपांना उत्तर देताना प्राजक्ता गायकवाडने सांगितले की, मालिकेचे चित्रीकरण साताऱ्याला असते. संपूर्ण टीम तिथेच राहते. त्यामुळे सेटवर उशिरा येण्याची तक्रार कुणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही. तसेच मालिका स्वीकारतानाच मी माझ्या परीक्षेबाबत सांगितले होते. पण, ‘आपण चित्रीकरण करतोय. तुला परीक्षेसाठी जाता येणार नाही’ असे मला सांगण्यात आले. मी परीक्षा देऊ शकले नाही. या सगळ्या वातावरणात काम करणे शक्य नसल्याचे सांगून मी मालिका सोडली.

प्राजक्ता म्हणाली, “मालिकेच्या सेटवरील जवळपास २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. गावकऱ्यांनी अडवले होते, शूटिंग थांबवले गेले होते. त्यानंतर मुंबईला शूटिंग करायचे ठरवले. मी पुण्यातून साताऱ्याला गेले, तेव्हा तुझ्यासोबत विवेक सांगळेसुद्धा येणार आहे, असे सांगण्यात आले.

आम्ही एकाच गाडीने प्रवास करणार होतो. तो दोन तास उशिरा आला आणि त्याचे कारण विचारले तर त्याने सांगितले जे करोना पॉझिटिव्ह आढळले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून येतोय.”

पुढे प्राजक्ता म्हणते “साहजिकच अख्खं जग एवढी काळजी घेत असताना, त्या व्यक्तीसोबत मी सातारा ते मुंबई इतका प्रवास कसा करणार? मी प्रश्न विचारला तर त्याने मला शिव्या दिल्या. तुला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले असेल पण मी नाही घेणार, म्हणत त्याने शिवीगाळ केली. ही घटना मी अलकाताईंच्या कानावर दोन-तीन वेळा घातली. त्यांनी फक्त मी बघते असे उत्तर दिले. त्यांच्याकडून या घटनेची दखल घेतली गेली नाही.”

“अलकाताई स्वत: स्त्री आहे, त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर मला खात्री आहे की त्या गप्प बसल्या नसत्या. विवेक सांगळे ही व्यक्ती समोर आली तरी मला शिवीगाळची घटना आठवते. त्याच्यामुळे खरेतर मी मालिका सोडली.

“विवेक सांगळेने दिलेल्या शिवीगाळच्या घटनेनंतरही मी दीड महिना शूटिंग केले. एक सॉरी जरी म्हटले तरी मी विचार केला असता. पण त्याने माफी मागितलीच नाही. निर्मात्या आणि एक स्त्री म्हणून अलकाताईंनी या प्रकरणाची दखल घेण्याची गरज होती. तुम्हाला सीरिअल पुढे चालवायची आहे म्हणून तुम्ही अशा नराधमांना पाठिशी घालता, हे चुकीचे आहे,” असे ती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

माश्याचा काटा घशात अडकल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; १ मिनिटात निघून जाईल काटा

विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या पोरीला शक्ती कपूरने घरातून फरफटत आणले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.