‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडच ‘लॉकडाऊन लग्न’, म्हणतेय ही तर नवीन सुरवात..

झी मराठी वरील ‘स्वराज्य रक्षक संभाजीमहाराज’ या मालिकेतील येसूबाई पात्र आपल्या सर्वांच्या आवडीच आहे. अत्यंत कणखर आणि निर्भीड अस यसुबाई पात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने साकारल होत. तिच्या या भूमेकेसाठी देशभरातील शिवप्रेमींनी प्रतिसाद दिला होता.

‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून तिने मनोरंजन सृष्टीत पदार्पण केल. या मालिकेतही तिची महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. तसेच ‘संत तुकाराम’ मालिकेत बहिणाबाई हे पात्र तिने साकारल. परंतु ‘स्वराज्य रक्षक संभाजीमहाराज’ मालिकेतून ती घराघरात पोहचली.

‘स्वराज्य रक्षक संभाजीमहाराज’ मालिकेनंतर ती ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेत काही दिवस पाहायला मिळाली. नंतर तिच्यात आणि निर्मात्यांमध्ये वाद झाले आणि तिने ही मालिका सोडली. मालिकेतील यश संपादन केल्यानंतर आता ती चित्रपटाकडे वळली. याबाबत तिने फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

गणपती बाप्पा मोरया म्हणत १४ मे रोजी ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ‘अक्षय तृतीया’ अश्या सर्व शुभ मुहूर्त दिनी ‘प्राजक्ता गायकवाडने आपल्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात केली.प्राजक्ताने तिच्या इंस्ताग्राम वर पोस्ट केली की ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असल्याचे सांगितले.

‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचे निर्माती किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, आणि सागर पाठक यांनी केली आहे. तर निनाद बत्तीन आणि तरबेज पटेल सहनिर्मिती करणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित संघमित्रा आहे. या चित्रपटाच्या शुटींगची सुरवात लवकरच लंडन येथे होणार आहे.

हे ही वाचा-

ही दोस्ती तुटायची न्हाय! दोन मित्रांनी आपल्या कोरोनाग्रस्त मित्रासाठी जे केलं ते पाहून सलाम ठोकाल

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते अगदी खर; पहा उर्मिला कोठारे आणि चिमुरड्या जीजाचा डान्स

एकेकाळी भाडे देण्यासाठी खिशात नव्हते पैसे, आज या अलिशान गोष्टी वापरून जगतोय राजा सारखे जीवन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.