कडक सल्युट! एव्हरेस्टवीर परदेशी यांनी मालवणच्या समुद्रात ४०० फूट साकारला तिरंगा

नेहमीच वेगवेगळे विक्रम करणारे महाराष्ट्रातील लोणंदचे एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी अजुन एक नवा विक्रम केला आहे. आपल्या सैनिकांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सलामी देण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणमधील दांडी समुद्राच्या मध्यभागी जाऊन ४०० फूट लांब भारताचा तिरंगा बनवला आहे. विशेष म्हणजे पाण्यातील माश्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणुन त्यांनी निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा बनवला.

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ त्यांनी तीन बोटीच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने ते तीन बोटींद्वारे तीन किलोमीटर आत समुद्रामध्ये गेले. यानंतर दांडी बीच समुद्रात निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा साकारला.

भारतमाता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने मालवणचा समुद्रकिनारा दुमदुमुन गेला होता. मालवण समुद्रामध्ये याआधी प्राजित परदेशी यांनी ३२१ फूट तिरंगा फडकवला होता. त्या आधी मागच्या वर्षी सिंहगडावर ३५० फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती.

शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल; ‘राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण….’

अनिल कपूर श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचे; कारण समजले तर तुम्ही थक्क व्हाल

“वार्ड रचना रद्द करून ग्रामपंचायत सदस्य जनतेतून निवडा”; भास्कर पेरे पाटलांची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.