आज प्राजक्ता माळीला ओळखत नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही. खुपच कमी वेळात प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर प्राजक्ताने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तिने अभिनयामध्ये प्रवेश केला.
प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमूळे घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली.
प्राजक्ता माळीला अभिनयासोबतच डान्सची देखील खुप जास्त आवड आहे. प्राजक्ताने ‘तांदूळा एक मुखवटा’ या चित्रपटातून अभिनय प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर तिने बंध रेशमाचे आणि सुवासिनी या मालिकांमध्ये काम केले.
त्यानंतर तिला ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने तिला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. तिचा अभिनय पाहून तिला ‘खो खो’ या चित्रपटाची ऑफर आली. हा चित्रपट हिट झाला आणि ती परत प्रसिद्ध झाली.
प्राजक्ताने अनेक कार्यक्रमांचे निवेदन देखील केले आहे. आत्ता ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची निवेदक म्हणून काम करत आहे. पण सध्या ती अजून एका कारणामुळे खुप जास्त जास्त चर्चेत आहे.
हे कारण म्हणजे प्राजक्ता माळीचे लग्न. ती २०२० मध्ये लग्न करणार आहे असे बोलले जात आहे. तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ‘मी लग्नासाठी तयार आहे. माझे घरचे माझ्यासाठी मुलगा शोधत आहेत. सगळे काही नीट झाले तर मी या वर्षी लग्न करू शकते’.
प्राजक्ताने तिला कसा जोडीदार हवा आहे. या गोष्टीबद्दल देखील माहीती दिली आहे. ती म्हणाली की, ‘मी अभिनेत्री आहे. त्यामूळे मला समजून घेणारा मुलगा हवा आहे. त्यासोबतच त्याने मी जशी आहे. तसा माझा स्वीकार केला पहिजे. अशा मुलासोबत मी लग्न करेल’.
मी माझ्या कामात व्यस्त असते. कधी कधी मी रात्री शुटिंग करत असते. त्यामुळे या सर्व गोष्टी समजून घेणारा मुलगा मला माझा जोडीदार म्हणून हवा आहे. त्याच्या कुटुंबाला माझे काम मान्य असायला हवे आहे. असा मुलगा मिळाला तर मी लगेच लग्नासाठी तयार आहे’. असे देखील ती म्हणाली.
लग्न योग्य वेळी झालेले चांगले असते. असे तिचे म्हणणे आहे. त्यामूळे तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ता सध्या ‘मस्त महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या कामात व्यस्त आहे. त्यामूळे तिच्याकडे मुलांना भेटायला वेळ नाही. पण घराच्यांनी तिचे नाव अनेक विवाह संस्थामध्ये नोंदवले आहे. लवकरच ती लग्न बंधनात अडकू शकते.
महत्वाच्या बातम्या –
बिगबाॅस फेम मराठी अभिनेत्रीने बंगाली पद्धतीने केले लग्न, पतीचे नाव ऐकून चकीत व्हाल; पहा फोटो..
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य नारायणने केले लग्न; फोटो झाले व्हायरल
;म्हणून अमिताभ बच्चनने घाईघाईत उरकवले होते मुलगी श्वेताचे लग्न